HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

राज्यात एकत्र आहोत, केंद्रातही असायला हवं ! काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीला सुनावलं

मुंबई | लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळानंतर भाजप सरकारने केंद्रात कृषी विधेयके मंजूर करून घेतली.या विधेयकांना विरोध करताना काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली काही खासदाराचं निलंबनही करण्यात आलं. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका संशयास्पद राहिली.शिवसेनेत लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला तर राज्यसभेत विरोध केला.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या विधेयकाच्या मंजुरीच्या वेळी अनुपस्थित राहिले.

महाविकासआघाडीचं सरकार राज्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची केंद्रातील दुटप्पी भूमिका काँग्रेसला रूचलेली नाही. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी या मुद्द्यावरुन सूचक विधान केलं आहे. ‘शेतकरी गळचेपी होत आहे आणि मध्यस्तांचा फायदा होतोय, याला काँग्रेसचा विरोधच आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने सभात्याग का केला ते त्यांनाच विचारा. राज्यात आम्ही एकत्र आहोत, केंद्रातही एकत्र असायला हवं होतं. शेतकरी हितासाठी काँग्रेस लढत आहे, तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे हात मजबूत केले पाहिजेत,’ असं अशोक चव्हाण म्हणाले.

Related posts

जैविक इंधनावर भारताचे पहिले विमान उड्डाण यशस्वी

Gauri Tilekar

आसाममध्ये बॉम्बस्फोट, 11 लोक जखमी

News Desk

छत्तीसगढमधील नक्षलवादी हल्ल्यात भाजप आमदारासह ५ जवान शहीद

News Desk