HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेत्यांची आम्ही यादी देतो, त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार -जयंत पाटील

अहमदनगर। गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर ईडी आणि सीबीआयची टांगती तलवार आहे. म्हणून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे जाणीवपूर्वक सुरू आहे, असा आरोप करतानाच या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आणि ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचं काय झालं? हे एकदा ईडीने जनतेला सांगावे, असा सवालच आता जयंत पाटील यांनी केला आहे.

निळवंडे धरणाच्या कामाला प्रचंड गती

2014 ते 2019 याकाळात नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा निळवंडे धरणाचे काम संथगतीने सुरू होते. महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला प्रचंड गती मिळाली असून 2024 पर्यंत या प्रकल्पाच्या कालव्याची कामे पूर्ण करून या भागातील सिंचन क्षमतेत वाढ केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. अहमदनगर शहरातून जाणाऱ्या सिना नदीच्या पात्रातील निळ्या व लाल पूररेषेत सुधारणा व्हावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. एनजीटीच्या नियमात राहून जलसंपदा विभागाने नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करून निळी व लाल पूररेषेत किती सुधारणा होऊ शकते याचा अभ्यास करून मनपाला कळवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मनीलॉड्रींगचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला गेला

खडसे यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत, तो मनीलॉड्रींगचा प्रकार नाही. त्यांच्या जावयाने कर्ज काढून त्या जमीनीचा व्यवहार केला आहे. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्या बाबतीतही लोकांनी कारखान्यात पैसे जमा केले आहेत. तरीही मनीलॉड्रींगचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला गेला आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे, असा दावा त्यांनी केला. अनिल देशमुख यांच्यावरही पैसे मागितल्याचा आरोप झाला. त्यांनी पैसे घेतले नाही असं अधिकारी भुजबळ व संजय पाटील या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असताना दिलेल्या धमक्यांचे व्हिडिओ बाहेर काढायला लावू नका, धनंजय मुंडेंचा फडणवीसांना इशारा

News Desk

रत्नागिरी अन् वाशीममध्ये २ जण कोरोना पॉझिटिव्ही, दिल्लीच्या मरकजमध्ये होते सहभागी

swarit

लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण, संजय राऊतांनी दिलं उत्तर

News Desk