HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

राज्यपालांनी फोन करून भेटायला बोलावले, कशासाठी ते अद्याप माहिती नाही !

मुंबई | सत्ता स्थापनेसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी निमंत्रण दिले आहे. “राज्यपालांनी राष्ट्रवादीला फोन करून भेटीसाठी बोलवले आहे. मात्र, राज्यपालांनी कशासाठी बोलावले अद्याप माहिती नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी नेते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहे.  राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेप्रमाणे सत्ता स्थापनेसाठी २४ तासाचा कालावधी दिला आहे.

नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची युवा नेता आदित्य ठाकरे आणि शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी आज (११ नोव्हेंबर) भेट घेतली. या भेटीदरम्यान शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ वाढून देण्याची मागणी केली होती. मात्र, “राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार,” दिल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितेल. यामुळे मुदतीस सरकार स्थापन करण्यास शिवसेना अपयशी ठरली आहे. मात्र, “राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्याची इच्छा,” देखील आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी अवघे २४ तास मिळाले होते. मात्र, या काँग्रेसच्या पत्रात शिवसेनेला पाठिंबा दिल्ल्याचा उल्लेख केला नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पुढेही चर्चा करणार असल्याचे पत्रका म्हटले आहे. यामुळे शिवसेना सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्यानंत राज्यात राष्टपती राजवटी लागू ताट शक्यता वर्तवली जात आहे. यानतंर तब्बल तीन तासानंतर दिल्लीत काँग्रेसची बैठक संपली. मात्र, या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित निर्णय घेईल, असे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Related posts

रोड शोदरम्यान पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकावली

News Desk

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात !

News Desk

महाराष्ट्र शिक्षक परिषदेला लागले भाजपाचे ‘ग्रहण’

News Desk