मुंबई | “आजच्या सत्ताधीशांना विरोध काही सहन होत नाही. आजही गोडसे जिवंत आहेत,” अशी शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील गोळीबारचा निषेध केला. आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधींच्या विचारांचे अनुसरण करण्याची शपथ घेतो.आणि आजच्या दिवशी ही दुर्दैवाना घटना आहे. यामुळे लोकशाही देशात आजही ‘गोडसे’ अजूनही जिवंत आहेत, असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांनी आज (३० जानेवारी) नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात आंदोलनात गोळीबार झाल्याची घटना घडली. या आंदोलनादरम्यान गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळख पटली असून त्यांचे नाव रामभक्त गोपाल शर्मा असे आहे.
I condemn the cowardly attack at #jamia. We solemnly take an oath to follow the thoughts of Mahatma Gandhi on his death anniversary but unfortunately the 'Godse’s’ are still alive in this Democratic country.
तुम कितने गांधी मारोगे
हर घर से गांधी निकलेगा#JamiaViolence pic.twitter.com/yrGDGk8Qfa— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 30, 2020
जयंत पाटील म्हणाले की, “केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात देशभरात जनता शांत व शिस्तबद्धपद्धतीने आंदोलन करत आहे, आपली भूमिका मांडत आहे.मात्र आजच्या सत्ताधीशांना विरोध काही सहन होत नाही. धर्मांध शक्तींचे हस्तक गोळीबार करत आहेत. विरोध होतोय म्हणून केंद्र सरकारने चिडून जाऊ नये. लोक शांतपणे आंदोलन करत आहेत त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, त्यांना संरक्षण द्या,” अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
आरोपीने मोर्चात पिस्तुल दाखवल्यानंतर शादाब आलम या तरुणाने थांबवण्याच प्रयत्न केला. मात्र, यात शादाब आलमच्या हाताला गोळी लागली. सध्या त्यांच्यावर होली फॅमिली रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जामिया परिसरात दुपारच्या सुमारास गोपाल येथे पिस्तुल घेऊन दाखल झाला. आणि गोळीबार केली.
आम्ही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधींच्या विचारांचे अनुसरण करण्याची शपथ घेतो परंतु दुर्दैवाने या लोकशाही देशात ‘गोडसे’ अजूनही जिवंत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.