HW News Marathi
देश / विदेश

ममता बॅनर्जींनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, संजय राऊत-आदित्य ठाकरेंची घेणार भेट

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिद्धिविनयाक मंदिराचे दर्शन घेतले आहे. बॅनर्जी या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलींच्या स्वागत समारंभात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. बॅनर्जी मुंबईत ७. ३० वाजात राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, बॅनर्जी उद्या (१ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जावून त्यांची भेट घेणार आहे. याभेटीत नेमके कोणत्या राजकीय गोष्टीवर चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

बॅनर्जी या तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. बॅनर्जी यांच्या तीन दिवस मुंबईत मुक्कम असेल. या तीन त्या दिवसाच्या काळात सर्वात महत्वाची राजकीय भेट आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी बनर्जी यांचा प्रचारासाठी गेले होते. दरम्यान, बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत होत्या. त्यावेळी बनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, बनर्जींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट गेतली नव्हती.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात काँग्रेसकडून बाळासाहेब ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न!; मोदींचा गंभीर आरोप

Aprna

‘मी आनंदी आहे, पण समाधानी नाही’- रवीकुमार दहिया

News Desk

देशाची आर्थिक घडी पूर्ववत होण्याच्या मार्गावर!

News Desk