HW News Marathi
महाराष्ट्र

गेल्या ६ महिन्यात माझ्यावर १० अग्रलेख, मला इतकं महत्व राऊत का देतायत?

मुंबई | “संजय राऊत यांची मराठी आणि इंग्लिशची शिकवणी घेतली पाहिजे. त्यांना हरामखोर आणि नॉटी एकच वाटतं. तसंच one fine morning चा अर्थ त्यांना कळला नाही. त्याचा अर्थ पहाट नसून अचानक असा होतो, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. संजय राऊतांचे किती अज्ञान आहे असेही त्यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की, मागच्या ६ महिन्यात माझ्यावर सामनात १० अग्रलेख लिहिले गेले. मला का एवढं महत्व देत आहेत कळत नाही”, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर खोचक टीकाही केली आहे.

काय लिहिले होते अग्रलेखात?

‘पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत.पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत.’ असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या आजच्या (३० सप्टेंबर) अग्रलेखातून भाजपला टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

News Desk

आघाडी सरकारने वेगवेगळे लढा, चंद्रकांत पाटील यांचे ओपन चॅलेंज…! 

News Desk

राज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून दोन महिन्यांच्या आत अंमलबजावणी करणार

News Desk