HW News Marathi
Covid-19

पतसंस्था चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार | जयंत पाटील

मुंबई | महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या समवेत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या कालावधीत राज्यातील पतसंस्थाना आलेल्या अडचणी राज्याचे जलसंपदामंत्री आणि सध्या प्रभारी चार्ज असलेले सहकार मंत्री जयंत पाटील यांनी आज (२५ ऑगस्ट) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाणून घेतल्या. “राज्यात कार्यरत असणार्‍या २२ हजार पतसंस्थांमध्ये ४.५ लाख कर्मचारी काम करत असून सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळीला बळकटी देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या फेडरेशनने यावेळी मांडल्या. प्रलंबित प्रश्नांसाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल”, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

“पतसंस्थांना एका वेबपोर्टलवर आणून १०१ चे दाखले आॅनलाईन देण्याचे, शासकीय कागदपत्रांकरीता पतसंस्थांना शासकीय कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी करण्याचा प्रयत्न करू असे सांगतानाच अहमदनगर जिल्ह्याप्रमाणे इतर जिल्हयातील पतसंस्थांनी जिल्हानिहाय स्थैर्य निधी उभा करण्यासाठी प्रयत्न करावेत”, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. येत्या ५ दिवसात हे संपूर्ण प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालय पातळीवर उच्चस्तरीय बैठक आयोजित करून ताबडतोब निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून जयंत पाटलांनी आश्वासन दिले असून प्रशासनाला सूचनाही केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी कोरोना रोखण्यासाठी फिरत आहे, आणि जर माझ्यावर गुन्हा दाखल केला तर…

News Desk

साखर उद्योगातून ऑक्सिजन निर्मिती ! देशातील पहिल्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

News Desk

चिंता वाढली ! राज्यात आज ८ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

News Desk