HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांबद्दल आम्हाला आदर, पण सोनिया गांधींच आमच्या नेत्या, कॉंग्रेसची ठाम भूमिका

सोलापूर | UPA च्या अध्यक्षपदाच्या वादावरुन शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात सुरु असलेल्या शाब्दिक वादावादीत आता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही उडी घेतली आहे. शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण सोनिय गांधी याच आमच्या नेत्या असल्याचे प्रणिती यांनी स्पष्ट केले आहे.

आज (२७ मार्च) सोलापुरात प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी UPA अध्यक्षपदाच्या वादाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे. महाविकास आघाडी एकत्र येण्यामध्ये देखील पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. मात्र सोनिया गांधी या यूपीएच्या चेअरमन आहेत आणि त्याच आमच्या नेत्या असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

‘काँग्रेस नेत्यांवरची टीका सहन केली जाणार नाही’

यूपीएच्या अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांच्याकडून सुरु असलेली शरद पवारांची वकिली त्यांनी थांबवावी, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली १० वर्षे मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार मंत्री होते हे विसरता कामा नये. काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार आहोत. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यूपीएमध्ये नसणाऱ्यांनी ही फुकटची वकिली करू नये, असा टोलाही नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला.

काय म्हणाले होते संजय राऊत?

“देशात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि त्यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावेत असं वाटत असेल, तर युपीएचं नेतृत्व पवारांसारख्या नेत्याने करावं”, असं राऊत म्हणाले आहेत. “आत्तापर्यंत सोनिया गांधींनी हे नेतृत्त्व उत्तम पणे केलं आहे. पण युपीएची ताकद सध्या कमी झाली आहे. सोनिया गांधींची प्रकृती बरी नसते. त्या आता सक्रिय राजकारणात फार दिसत नाहीत. देशात सध्या अनेक प्रादेशिक पक्ष एनडीए किंवा युपीएमध्ये नाहीत, पण त्यांना भाजपविरोधात उभं राहण्याची इच्छा आहे. या पक्षांना युपीएमध्ये आणण्यासाठी शरद पवार हेच नाव मला दिसतं आहे”, असं राऊत यावेळी म्हणाले.

UPAची चिंता संजय राऊतांनी करु नये ! – नाना पटोले

नाना पटोले यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊतांच्या UPAच्या नेतृत्वाबद्दलच्या भूमिकेबाबतही इशारा दिला आहे. शरद पवार यांनी UPAचे नेतृत्व करावे या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. नाना पटोले म्हणाले कि, “संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? शिवसेना ही UPAची घटक पक्षही नाही. संजय राऊत यांना युपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. सोनियाजी गांधी या नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. UPAची चिंता संजय राऊत यांनी करु नये”, असेही नाना पटोलेंनी बजावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MaharashtraBudget Live Updates : आमदार विकास निधी २ कोटीवरून ३ कोटीवर

swarit

अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होण्यापूर्वीच फुटला !

News Desk

‘पर्यावरण बचाना अपने हाथ में है भिडू’, जॅकी श्रॉफ यांनी राजभवनावर घेतली राज्यपालांची भेट

Manasi Devkar