HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही पण आंदोलनं आणि निदर्शनं करा, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला!

बुलडाणा। एकीकडे या ना त्या मुद्यावरून भाजपच्या नेत्यांनी आंदोलनं करून महाविकास आघाडी सरकारच्या नाकीनऊ आणले आहे. पण, अशातच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी ‘कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनं करा, निदर्शनं करा’ असा अजब सल्ला दिला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येत उपस्थिती होती. या कार्यक्रमात संबोधित करताना राजेंद्र शिंगणेंनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला.

आपल्या सत्तेत असलेल्या सरकारचा विचार न करता चक्क रस्त्यावर उतरून आंदोलनं करा

‘जरी आपलं सरकार असलं आणि आपल्या मना विरोधी काम होत असेल तर आपल्या सत्तेत असलेल्या सरकारचा विचार न करता चक्क रस्त्यावर उतरून आंदोलनं करा, असा सल्लाच शिंगणे यांनी दिला. आता राज्याच्या मंत्र्याकडूनच अशा प्रकारचा सल्ला तेही आपल्याचं सरकार विरोधात दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .तसंच, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात मंत्री डॉ.शिंगणे यांनी पुनरुच्चार केला. ऑक्टोबरमध्ये तिसरी कोरोनाची लाट येऊ शकते’ असा अंदाज शिंगणे यांनी व्यक्त केला.

‘दुसऱ्या लाटेत कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णापेक्षा ही लाट दीड पटीने वाढलेली असेल. त्यामुळे राज्य सरकारकडून त्या परीने काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आपण सतर्क राहायला पाहिजे, असंही शिंगणे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण नाही!

News Desk

म्हणे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ते मुंबई स्वतः गाडी चालवली, उद्या ते गाडी पण धुतील मग काय करू?

News Desk

पोंभुर्णा तालुक्‍याच्‍या विकासाची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार! – सुधीर मुनगंटीवार

Aprna