HW News Marathi
महाराष्ट्र

डी-गँग आणि राणा दाम्पत्यांच्या संबंधाची ED चौकशी का केली नाही?, राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | युसूफ लकडावाला खासदार नवनीत राणा यांच्यासोबत झालेला ८० लाखाच्या आर्थिक व्यवहार प्रकरणी त्यांची ईडीने चौकशी का केली नाही?, ते का लपवण्यात आले, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राऊतांनी काल रात्री (२६ एप्रिल) ट्वीट करून नवनीत राणांनी लकडावालाकडून ८० लाखाचे कर्ज घेतले होते. या प्रकरणी राऊतांनी आज (२७ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकाद राणा दाम्पत्य, भाजपनेते किरीट सोमय्या आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. 

युसूफ लकडावाला आणि राणा दाम्पत्यांचा संबधिता असलेले ट्वीट करत जी माहिती दिली यावर बोलताना राऊत म्हणाले, “तुरुंगात असलेल्या नवनीत राणा त्यांचे  अंडरवर्ल्ड संबंध समोर आले आहेत. हे प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असून युसूफ लकडावाला आहे. तुम्ही लकडावाला बद्दल शोधले तर तुम्हाला कळेल की, लकडावाला हा दाऊदचा फायनान्सर म्हणून ओळखला जात होता. २०० कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना अटक केले होती. आणि लकडावाला यांचे ज्या ज्या व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार झाले होते. त्या सर्वांची तपासणी झाली होती. परंतु, लकडावाला यांच्याशी नवनीत राणा यांच्यासोबत झालेला ८० लाखाच्या आर्थिक व्यवहार प्रकरणी त्यांची तपासणी का नाही झाली?, ते का लपवण्यात आले. नवनीत राणाला चौकशीसाठी का नाही बोलविले. हा प्रश्न ईडीलाच नाही तर इवीडब्ल्यूला पण आहे. कोणी तरी यांना वाचवित आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मुंबई आणि महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचा जे प्रयत्न सुरू आहेत. मग ते हनुमान चालिसापासून ते भोंग्यांपर्यंत या मागे अंडरवर्ल्डचे षडयंत्र आहे. आणि या मागे अंडरवर्ल्डचे पैसे लागले आहे. या लोकांना पकडून अंडरवर्ल्ड येथे दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण करणे होते. आता यांना पैसे कुठून येत होते. हे हळूहळू उघड होईल. येत्या काळात अजून काही खुलासे उघड होणार आहेत.” 

“राणा दाम्पत्य अचानक हनुमान भक्त झाले असून आणि त्या भक्तीमध्ये इतके डुबले की, मुंबई येऊन धिंगाना करू लागले. मुंबईचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. मातोश्रीला अहवान द्याचा प्रयत्न केला. राज्यात हनुमान चालिसा आणि भोंग्यावरून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या मागे अंडरवर्ल्डचा संबंध आहे. जसे १९९२ च्या दंगलीत अंडरवर्ल्डचे संबंध होते. आणि पाकिस्तान आणि डी गँग संबंध होते. हनुमान चालिसा आणि भोंग्या प्रकरणावरून राज्यात पुन्हा दंगलीचे वातावरण निर्माण केले जात आहे. हनुमान चालिसा आणि भोंग्या प्रकरणावरून मुंबईचे वातावरण बिघडवण्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन असून त्यांचे पैसा काम करत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा फायनान्सर म्हणून ओळखले जात होते. राणा दाम्पत्या आणि लखडावाला आर्थिक हितसंबंध कसे आहेत. याचे लहानसे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची इडीकडून चौकशी का झाली नाही, असा सवाल राऊतांनी सांगितला आहे, ” असे राऊत म्हणाले

पांडू हवालदाच्या धर्तीवर भाजप हवालदार 

सामनाच्या आग्रलेखात राणा दाम्पत्य आणि समोय्यांना सोंगाड्या राऊत बोलताना म्हणाले, “हे सगळे सोंगाडे आहेत आणि जर दादा कोंडके असते तर त्यांना सिनेमासाठी खूप विषय मिळाले असते. पांडू हवालदाच्या धर्तीवर भाजप हवालदार त्यांनी काढला असता. सोंगाड्यानंबर २ काढला असता. ऐवढे सोंगाडे काढले आहेत. की प्रत्येक सोंगाड्यावर सिनेमा आला होता. फडणवीस म्हणाले की शिवसेनेचा हिंदुत्व हे गदाधारी नाही तर गदाधारी आहे, यावर बोलताना म्हणाले, “आम्ही गाढवापासून लांब गेलो आहे. त्यामुळे आमच्याकडे आता फक्त गदा आहे. 

Related posts

कोरेगाव-भीमा प्रकरणात पोलिसांनी पुरावे तोडून-मोडून सादर केले…

swarit

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

मुंबईतील निर्बंधात शिथिलता; पहा काय आहेत नवे नियम

News Desk