मुंबई: घाटकोपरमधील दामोदर पार्क भागातील साईदर्शन नावाची एक चार मजली इमारत कोसळून ८ जण ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.
इमारतीच्या ढिगाºयाखाली अद्याप ३०-३५ जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आठ जणांना ढिगाºयाखालून काढण्यात यश आले असून यांपैकी २ जण रुग्ण अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या इमारतींखाली असलेल्या रुग्णालयाकडून अनधिकृतरित्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच अग्निशामकदलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकही (एनडीआरएफ) घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. इमारतीच्या यातून ८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर एक लहान मुलांचे रुग्णालय असून या रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरु असताना ही इमारत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.