HW News Marathi
मुंबई

ओला – उबेर विरोधात टॅक्सी चालकांचा वांद्रे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

सुरेश काळे/ शुभम देशमाने

मुंबई गेल्या कित्येक वर्षांपासून काळी – पिवळी टॅक्सी चालक ओला व उबेर विरोधात आंदोलन करत आहेत परंतु या आंदोलनाचा काही परिणाम जाणवत नसल्यामुळे आज वांद्रे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर जय भगवान महा संघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

या मोरच्यात मोठ्या संख्येत टॅक्सी चालक सहभागी झाले होते. ते परिवहन कार्यालयात आपले परवाने जमा करून ओला आणि उबेर या टॉक्सिचा निषेध करत आहेत. काळी- पिवळी टॅक्सी साठी अॅप देऊन टॅक्सी विषयी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ व ओला उबेर या टॅक्सी विषयी काही उपाय योजना काढू असे आश्वासन मुख्यमंत्र कडून देण्यात आले होते. या ओला आणि उबेर यांच्या वाढीमुळे टॅक्सी चालकांवर गंभीर परिस्थिती ओढावली असून केंद्र सरकार काहीच हालचाल करत नाही म्हणून हा मोर्चा काढण्यात आला . पूर्वी पण रिक्षाचालकांनी याविरोधी आंदोलन केले होते तरी यावर ठाम निर्णय काही झालाच नाही. आता या मोरच्यातून टॉक्सिचालकांना काय फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात कोरोनाबाधितंचा आकडा ८९ वर

swarit

सुप्रियाजी मला फक्त १५ दिवस द्या…!

News Desk

बंदमुळे जो भडका उडाला, सुप्रीम कोर्ट आणि शासन जबाबदार

News Desk