HW News Marathi
मुंबई

जामखेडमध्ये मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन

अहमदनगर : शारीरिक व्यंगामुळे चेह-यावरचे स्मित हास्य गमावलेल्यांच्या चेह-यावर पुन्हा हास्य फुलवण्यासाठी जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या जामखेड येथील रुग्णालयात 10 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कॅनडा आणि इटलीतील तज्ञ डॉक्टरांमार्फत या शिबिरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. फाटलेले ओठ, छिद्र पडलेली टाळू, जन्मजात चिकटलेली हातापायांची बोटे, भाजल्यामुळे चिकटलेले अवयव, चेह-यातील विकृती यावर या शिबिरामध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

ग्रामीण आरोग्य प्रकल्पात यापूर्वी डिसेंबर, 2016 मध्ये मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 60 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते स्व. डॉ. रजनीकांत आरोळे आणि डॉ. मेबल आरोळे यांनी स्थापन केलेल्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या 45 वर्षांपासून सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सेवा बजावली जात आहे. सदर शिबीर हे ग्रामीण भागातील गरजूंसाठी आयोजित करण्यात आले आहे, जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक रवी आरोळे यांनी केले आहे. शिबिरासाठी नोंदणी आणि तपासणी प्रक्रिया 10 जानेवारीपासून सुरु झाली आहे. गरजूंनी नोंदणीसाठी 77200 62555 किंवा 9423183707 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन संस्थेच्यावतीने आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अँटॉप हिल स्फोट प्रकरणात दोन जणांना अटक

News Desk

बीआरटी टेंडरमध्ये मंत्र्याचा हस्तक्षेप ; मनसेचा आरोप

News Desk

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट कामगार संपावर

News Desk