HW News Marathi
मुंबई

…तर मनसेच्या मीनाक्षी डोईफोडे गुडघ्यावर चालणार   

 

अनिरूद्ध गायकवाड

कल्याण – शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांनी जातीवाचक शिवीगाळ केली, मात्र पोलिसांनी फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल केला, त्यामुळं उगले यांच्याविरोधात अँट्रॉसिटी अँक्ट नुसार गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांनी उपोषण सुरू केलंय… 13 एप्रिलपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास न्यायासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत गुडघ्यावर चालत जाण्याचा निर्धार मीनाक्षी यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मोहन उगले यांनी चारित्र्यावरुन आक्षेपार्ह विधान करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप डोईफोडे यांनी केला आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रारी करुनही कुठलीही कारवाई न झाल्यानं डोईफोडे यांनी कल्याणच्या एसीपी ऑफिससमोर 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केलं आहे. तर शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांनी आरोप फेटाळले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माटुंगा किंग्ज सर्कल येथे चालत्या बसने घेतला पेट

News Desk

नाणार प्रकल्प होऊ देणार नाही: राणे

swarit

‘ट्री गणेशा’च्या रूपात बाप्पा राहणार आपल्यासोबत

swarit