HW News Marathi
मुंबई

दहिसर नदीच्या पात्रात पुन्हा आढळले मृत प्राण्यांचे अवशेष

जया पी.
मुंबई रिव्हर मार्च नदी संवर्धनाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नद्यांच्या संवर्धनसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. एकीकडे रिव्हर मार्चचे सदस्य दहिसर नदी वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना पुन्हा दहिसर नदीच्या पात्रात गुरुवारी मृत प्राण्यांचे अवशेष सापडले आहे. यामुळे रिव्हर मार्चच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यापूर्वी डिसेंबर महिन्यात दहिसर नदीच्या पात्रात मृत प्राण्यांचे अवशेष आढळले होते. त्यानंतर पुन्हा बुधवारी मृत प्राण्यांचे अवशेष आढळले आहेत. याबाबत रिव्हर मार्चच्या सदस्यांनी स्थानिक पालिका विभाग व पोलिसांना माहिती दिली. मात्र अदयाप त्यावर काहीच कारवाई झाली नाही.
आर उत्तर पालिका विभागाने संबंधित मृत प्राण्यांचे अवशेष टाकणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती रिव्हर मार्चचे सदस्य गोपाल झव्हेरी यांनी दिली. तसेच याच पाण्यात काहीजण मासेमारी करत असल्याचे आढळून आल्याचे झव्हेरी यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभाविपचा पाठिंबा

Gauri Tilekar

लोकलमध्ये मंगळसूत्र चोरून ट्रॅकवर उडी मारणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

News Desk

प्रलंयकारी 29 ऑगस्ट

News Desk