HW News Marathi
मुंबई

पेट्रोलपंपावरील बेकायदेशीर छापे न थांबल्यास बेमुदत संपाचा इशारा

ठाणे – गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी पेट्रोल पंपांवर छापे टाकायला सुरूवात केलीय. पेट्रोल पंपाच्या मशीनमध्ये चीपचा वापर करून पेट्रोलमध्ये घोटाळा करत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी पेट्रोल पंपांवर छापे टाकायला सुरूवात केलीय. केवळ संशयावरून केली जाणारी ही कारवाई न थांबल्यास ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक बेमुदत संपावर जातील, असा इशारा पेट्रोल डीलर्स असोशिएशननं दिलाय.

‘पोलिसांनी अमानवी पद्धतीने कारवाई सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांचे मोबाईल काढून मारहाण करणं चुकीचं आहे. आम्ही चोर नाही. सर्व तपासणी झाल्यावरच कारवाई झाली पाहिजे. संशयास्पद गोष्टींमुळे पूर्ण पेट्रोल पंप बंद केला जात आहे’, असं पेट्रोल डीलर्सच्या असोसिएशनने पत्रकार परिषदेत सांगितलं.

आम्ही 45 पेट्रोल पंपांचे मालक अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांना भेटलो आणि हा अमानवी प्रकार थांबवण्याची विनंती केली. पेट्रोल पंपाच्या मेंटेनन्सची बंद केलेली प्रक्रिया पुन्हा सुरु करावी, अशी मागणीही केली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी या छापेमारीमुळं घाबरले असून काम करायला तयार नसल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे. या संदर्भात गिरीश बापट यांनी आम्हाला दोन-तीन दिवसात चौकशी करण्याचं आश्वासन दिल्याचं असोशिएशननं म्हटलंय.

तुम्हीच आमचे साहित्य तपासा आणि आम्हला क्लीन अँड क्लीअरचा टॅग दया, जेणेकरुन बाहेरील एजन्सी आमच्यावर असे छापे टाकणार नाही, अशी विनंती इंडियन ऑईल, एचपीसीएल आणि बीपीसीएल यांना करणार असल्याचं पेट्रोल डीलर्स असोसिएशननं सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील डंपिंग ग्राऊंड आता अंबरनाथमध्ये हलवणार

News Desk

1300 मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

swarit

तरूणावर धारदार शस्त्राने वार करणारा गुन्हेगार अटक

News Desk