HW News Marathi
मुंबई

पत्नीच्या विरहाने पतीचेही निधन

वाडा (वार्ताहर) : विक्रमगड तालुक्यातील मौजे कुंर्झे येथील सुधाबाई रामचंद्र गायकवाड (७७)यांचे गेल्या शुक्रवारी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

या निधनानंतर अवघ्या सहाच दिवसांच्या अंतराने त्यांचे पती रामचंद्र गायकवाड (८२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पत्नीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानेच रामचंद्र गायकवाड यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असे त्यांच्या कुटूंबियांनी सांगितले. गायकवाड कुटुंबियांवर अचानक आलेल्या या दु:खामुळे संपूर्ण कुटुंबच हादरुन गेले आहे. आदिवासी विकासमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, विक्रमगड पंचायत समितीचे सभापती मधुकर खुताडे, तालुकाध्यक्ष संदीप पावडे यांनी या गायकवाड कुटुंबियांच्या घरी जाऊन गायकवाड परिवाराचे सांत्वन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पोलिसांची दडपशाही, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

News Desk

आमदार बच्चू कडू यांना एक वर्षांची शिक्षा

swarit

व्हिसीला बडतर्फ केले मग व्हिटीला कधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

News Desk
महाराष्ट्र

फळभाज्यांचे भाव गगनाला

News Desk

नाशिक : काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आवक घटली आहे. त्याच वेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरातमध्ये मोठया प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत. परिणामत; किरकोळ बाजारात फळभाज्यांचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहे.

नाशिक बाजारसमितीतून गुजरात राज्यात शेतमालाला मागणी वाढलेली असल्याने बाजारभावात तेजी निर्माण झालेली आहे. ढोबळी मिरची ३० रूपये प्रति किलो, लामडी वांगी ५० रूपये, दोडका ४० रूपये, भोपळा ३० रूपये नग, हिरवे वांगी ३५ रूपये, लाल वांगी ४० रूपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याचे भाजीपाला व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.

पावसाने सध्या उघडीप दिलेली असली, तरी नवीन फळभाज्या दाखल झाल्या नसल्याने बाजारभाव तेजीत आहे. मात्र आगामी काही दिवसात सर्वच फळभाज्या मोठया प्रमाणात दाखल होण्याची शक्यता असल्याने बाजारभाव घसरण्याची शक्यता असल्याचे बाजारसमिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत किमान ४० रुपये प्रतिकिलो बाजारभाव असलेल्या फळभाज्या किरकोळ बाजारात व हातगाडीवर ग्राहकांना ७० ते ८०रुपये प्रतिकिलो दराने खरेदी कराव्या लागत आहेत

Related posts

शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांशी संवाद साधणार; समाजमाध्यमांद्वारे होणार थेट प्रसारण

Aprna

‘फडणवीस सरकारचे चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीसही अडचणीत येतील’, पटोलेंचा गौप्यस्फोट

News Desk

धनंजय मुंडेंविरोधात तक्रार केलेली रेणू शर्मा पुन्हा पोलिस ठाण्यात दाखल

News Desk