HW News Marathi
मुंबई

हा विजय वेगळाच – उद्धव ठाकरे

अक्षय कदम
मुंबई – मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पाचव्यांदा विजयी झाली आहे. आधीच्या चार विजयांपेक्षा यावेळी मिळालेला विजय हा नक्कीच वेगळा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मुंबईतल्या फोर्ट इथे आयोजित शिवराय संचलन या कार्यक्रमात ते बोलत होते. निवडणुका असो वा नसो, आमच्या हातात भगवाच राहणार असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.
एकमेकांवर जी काही फेकाफेकी करायची ती झाली आहे. होळी, धुळवड, रंगपंचमी जे काय व्हायचं ते झाले आहे.
केंद्र सरकारमध्ये दोन लाखापेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. यासाठी मला लोकाधिकाराची गरज लागणार आहे. लोकाधिकारच्या माध्यमातून आपल्याला पाहावे लागेल. तिथे आपल्या मुला – मुलींना जास्तीतजास्त नोकऱ्या लागल्या पाहिजेत. आम्ही शिवरायांच्यासमोर झुकणारे आहोत इतर कोणाहीसमोर झुकणार नसल्याचे उद्धव यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

News Desk

माहुलमध्ये प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करू नका, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

News Desk
क्राइम

माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांना जीवे मारण्याची धमकी

News Desk

धमकी देणा-या विरुद्ध शिवाजीनगर नांदेड पोलिसांत गुन्हा दाखल

उत्तम बाबळे

नांदेड :- माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा यांना व कुटूंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणा-या एका इसमाविरुद्ध शिवाजीनगर ,नांदेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवा मोंढा नांदेड येथील निवासी असलेले प्रतिष्ठीत व्यापारी तथा कै.शंकर नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष,नांदेड माजी महापाैर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांचे विश्वसनिय सहकारी म्हणुन ओळखले जात होते.परंतू काँग्रेस पक्षातील नांदेड येथील कांही पदाधिका-यांसोबत त्यांची खटकली व त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला.त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला व माघील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणुन नांदेड मधून याच पक्षाकडून निवडणुक लढविली.यात त्यांना यश आले नाही.परंतू न खचता त्यांनी पक्ष वाढीसाठी जोमाने काम सूरु ठेवले आहे.अशातच गेल्या कांही दिवसापासून गणेश सखाराम वाघमारे रा.सांगवी ता.जि.नांदेड हा इसम पोकर्णा यांच्या मोबाईलवर काॅल करत आहे व काॅल रिसीव्ह केला की धमक्या देत आहे.५ मार्च रोज रविवारी ही त्या इसमाने मा.आ. पोकर्णा यांना फोन केला व म्हणाला की मी तुला आणि तुझ्या कुटूंबीयांना जीवे मारुन टाकेन.तुला खतम करेन.सततच्या या धमक्यांना त्रासलेल्या मा.आ.पोकर्णा यांनी ६ मार्च रोजी शिवाजीनगर,नांदेड पोलिस ठाणे गाठले व काॅल समरी रेकाॅर्ड व्हाईस पोलिसांना एैकविला.तसेच रितसर तक्रार पण दिली.या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांत गणेश वाघमारे विरुद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढिल अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत

 

Related posts

केवळ सहा महिन्यांमध्ये भारतात ४ लाख ३६ हजारांहून अधिक सायबर हल्ले

News Desk

अवैद्य दारू विक्री करणा-यांवर कारवाई , चार आरोपी अटक

News Desk

मोबाईल चोरामुळे तरुणीला एक पाय आणि हाताची बोटे गमवावी लागली

News Desk