मुंबई | अंधेरीतील ईएसआयसी (ESIC ) मरोळ परिसरातील कामगार रुग्णालयाला बुधवार (१९ डिसेंबर) पुन्हा आग लागली आहे. कामगार रुग्णालयाला सोमवारी(१७ डिसेंबर) आणि बुधवार (१९ डिसेंबर) दोन वेळा लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (१७ डिसेंबर)ला लागलेल्या भीषण आगीत १४६ जण जखमी झाले तर याच आगीत जखमी झालेले किसन नरावडे यांचा आज गुरुवारी (२० डिसेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला.
#UPDATE Fire at ESIC Kamgar Hospital in Mumbai's Andheri which broke out on 17 December: One more person dies at the hospital, death toll rises to 10.
— ANI (@ANI) December 20, 2018
कामगार रुग्णालय आग प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सुप्रमी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना गुरुवारी (२० डिसेंबर) अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीचा अभियंता नीलेश मेहता आणि सहायक अभियंता नितीन कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच रुग्णांना इमारतीमध्ये प्रवेश का दिला होता?, याबाबत त्या दोघांकडे चौकशी सुरू आहे. दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.