HW News Marathi
मुंबई

#26/11Attack : म्हणून मुंबईला आले फोर्स वन दल

मुंबई | २६/११च्या मुंबई हल्ला आज (२६ नोव्हेंबर)ला दहा वर्षे पुर्ण झाली आहेत. या हल्ल्यानंतर मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या हल्ल्यानंतर पुन्हा असा हल्ला होऊ नये, यासाठी अवघ्या वर्षभरात ‘फोर्स – वन’ नावाचे कमांडो दल समाविष्ट करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर, २००९ रोजी ‘फोर्स वन’ हे कमांडो दल पोलीस दलात कार्यरत झाले.

या फोर्स वन पोलीस दलाने पुणे येथील एसआरपीएफच्या तळावर दोन आठवड्यांचे शारीरिक प्रशिक्षण देण्यात आले. यात धावण्यापासून अनेक शारीरिक हालचालींचा समावेश होता, आणि हे प्रशिक्षण तितकेच खडतरही होते. त्यानंतर त्यांना ६० दिवसांचे ‘फायरिंग’ प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, पुण्यातील मिलिटरी इंजिनिअरिंग महाविद्यालयात चार दिवसांचा विशेष कोर्सही त्यांच्याकडून करवून घेण्यात आला.

यामध्ये इम्प्रूवाईज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) कसे तयार करायचे व ते डिफ्यूजही कसे करायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) मध्ये त्यांना लहान स्फोटकांबाबतही चार दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, त्यांना क्रव मागा हे इस्रायली मार्शल आर्ट शिकवून तयार करण्यात आले.

क्रव मागा हे बिनहत्यारी लढाईतील महत्त्वाचे आयुध असून, शस्त्र जवळ नसताना स्वतःचे संरक्षण करीत शत्रूला कसे नामोहरम करायचे, यासाठी ते महत्त्वाचे आहे. मुंबईतील फोर्स वन कमांडोजची कीर्ती अल्पावधीतच देशोदेशी पसरली असून, त्यांनी मोझांबिक पोलिसांना ट्रेनिंगही दिलेे. ते राज्यातील क्‍विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी), रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ), जम्मू-काश्मीर पोलिसांनाही वेळोवेळी प्रशिक्षणही देतात.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपादरम्यान बेस्टचे १९.८८ कोटींचे नुकसान

News Desk

आम्ही काय सतरंज्या उचलायच्या का; कार्यकर्त्याचा अजित पवारांना सवाल

News Desk

मुंबईत पेट्रोल दराने नव्वदी गाठली…

News Desk