HW News Marathi
मुंबई

लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ११ तासांचा मेगाब्लॉक

मुंबई | ना.म. जोशी मार्गावरील लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे जुने गर्डर काढून नवे टाकण्यासह अन्य काही कामासाठी २ फेब्रुवारी रात्री १० वाजल्यापासून ३ फेब्रुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत लोअर परळ ते चर्चगेट स्थानकादरम्यान एकही लोकल धावणार नसल्याची माहिती मिळत आहे. तब्बल ११ तासांच्या या मेगाब्लॉकमुळे लोअर परेल ते चर्चगेट दरम्यान २०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

विरार, वसई, भाईंदर, बोरीवली या स्थानकांवरून सुटणाऱ्या गाड्या केवळ प्रभादेवी स्थानकापर्यंत सुरु असतील. या उड्डाणपुलाच्या कामामुळे एक्स्प्रेसच्या वेळेत देखील बदल होतील. त्याचप्रमाणे काही गाड्या रद्द होण्याची देखील शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. या कामास रेल्वे बोर्डाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नालासोपारा बॉम्ब प्रकरणी एटीएसने १२ जणांना ताब्यात घेतले

News Desk

लोकलमध्ये महिलेची प्रसुती

News Desk

मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी केली शस्त्रांची पूजा

News Desk