HW News Marathi
मुंबई

बेस्टच्या संपाचा नववा दिवस, मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज (१६ जानेवारी) नववा दिवस आहे. या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघाला नाही. गेल्या ८ जानेवारीपासून ३२ हजार बेस्ट कामगार संपावर गेले आहेत. बेस्टच्या ३७०० बसेस जागीच उभ्या आहेत. बेस्टच्या विविध मागण्यासाठी स्थापन झालेल्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (१५ जानेवारी) स्वीकारला आहे.

संप मागे घेण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी बेस्ट कामगारांच्या संघटनांना बुधवारपर्यंतची मुदत दिली. न्यायालयातील युक्‍तिवाद पाहता बुधवारी (१६ जानेवारी) हा संप मिटण्याची आशा व्यक्त केली जात आहे. आम्ही केवळ कामगार आणि प्रशासन यांना चर्चेसाठी योग्य व्यासपीठ मिळवून देऊ शकतो.

शेवटी निर्णय हा बेस्ट कामगार आणि बेस्ट प्रशासन यांनीच घ्यावा असे सांगत न्या. नरेश पाटील आणि न्या. एन.एम. जामदार यांच्या खंडपीठाने बुधवारी ११ वाजता संप मागे घेण्याबाबतचा अंतीम निर्णय सांगा, असे स्पष्ट करीत याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील सर्व खड्डे भरणार,आयुक्तांचे गणेशोत्सव मंडळांना आश्वासन

News Desk

पालकमंत्र्यांनी केले मिसाल मुंबईचे कौतुक

News Desk

स्विफ्ट कारमधील तिघांचा जळून मृत्यू.. घातपाताची शक्यता ?

News Desk