HW News Marathi
मुंबई

जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या भूमिका सिंगची आत्महत्या

मुंबई | वाकोला परिसरात एका ३० वर्षीय भूमिका सिंग नावाच्या महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाकोल्यातील नोबल अपार्टमेंट या इमारतीत भूमिका सिंग राहत होती.

भूमिका ‘वर्ल्डवाईड कम्युनिकेशन ग्रुप डीडीबी मुद्रा ग्रुप’मध्ये कार्यरत होती. तिचे पती विनय सिंगसुद्धा याच कंपनीत कार्यरत आहेत. भूमिकाने गळफास घेऊन आपले आयुष्य का संपवले, याचे कारण अद्याप कळाले नसून वाकोला पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. घटनास्थळी सुसाईट नोट सापडली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्ट कर्मचाऱ्यांचे बोनससाठी बेमुदत धरणे आंदोलन

Gauri Tilekar

उद्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक! ‘परे’वर रात्रकालीन जम्बो ब्लॉक

News Desk

हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरचा शॉक लागून सर्वाधिक मृत्यू

News Desk