HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भाजप पराभूत- मुख्यमंत्र्यांना धक्का 

मुंबई- राज्यातल्या जवळपास 3 हजार 700 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होत आहे. मात्र नागपूर जिल्ह्यातल्या फेटरी ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारणही तसेच होते. हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेवूनही या गावाने मुख्यमंत्र्यांनाच धक्का दिला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला आहे.

या गावात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत धनश्री ढोमणे यांनी 300 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या ज्योती राऊत यांचा पराभव केला. या गावातल्या राजकारणा मी कधी पडलो नाही. किंवा त्यांनी भाजपला मतदान करावे असेही सांगितले नव्हते असे स्पष्टीकरण या पराभवा नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गिरगावच्या कोठारी हाऊस इमारतीला आग

swarit

नालासोपारा बॉम्ब प्रकरणी एटीएसने १२ जणांना ताब्यात घेतले

News Desk

Raj Thackeray ED : मरिन ड्राईव्ह, दादर, आझाद मैदानासह ईडी कार्यालयाबाहेर जमाव बंदी

News Desk