HW News Marathi
मुंबई

इमारत दुर्घटनेतील आरोपी बालंबाल बचावला

मुंबई – घाटकोपरमधील ३० वर्षे जुनी ‘साईदर्शन’ इमारत २५ जुलै रोजी कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता. तळमजल्यावर नर्सिंग होमचेनुतनीकरण करताना सुनील शितप याने इमारतीच्या मुख्य खांबांना धक्का लावल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी सुनील दुर्घटनेपूर्वी काही मिनिटे आधीच येथून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आहे.

घाटकोपर येथे झालेल्या इमारत दुर्घटनेच्या वेळेचं एक सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाले आहे. या प्रकरणात दोषी असलेला सुनील हा स्वत: या अपघातातून थोडक्यात बचावल्याचे सीसीटीव्ही फूटेजमधून दिसते. दुर्घटना घडली त्याच्या अवघ्या काही मिनिटेपूर्वीच शितप या इमारतीतून बाहेर पडला होता. सीसीटीव्ही फूटेजनुसार, तो इमारतीतून बाहेर पडला आणि १० वाजून १९ मिनिटांनी गाडीत बसून गेला. त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत म्हणजे १० वाजून २४ मिनिटे झाली असताना ही इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भांडुप ते कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

भाजपचं सरकार गेलं तरच अच्छे दिन: अजित पवार

News Desk

शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द

News Desk