HW News Marathi
मुंबई

कंत्राटदारांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

मुंबई | सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई येथील त्रस्त कंत्राटदारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मुंबई पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. काही दिवसांपासून आझाद मैदानामध्ये मुंबईतल्या बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांचे आंदोलन सुरु आहे. अधिकाऱ्यांनी करोडोची कामे करून घेतली पण त्याचे पैसेच दिले नाहीत असा आरोप मोहन हरडे यांनी यावेळी केला.

२००८ पासून मंत्र्यांनी कामे तर करून घेतली पण कामाचे पैसेच दिले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. जवळ जवळ २०० कोटी रुपयांची थकित बिले ही सरकारने दिलीच नाहीत. यामध्ये मंत्र्यांचे बंगले आणि मनोरा निवास याचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे कामे करून घेतली पण त्याची बिल आता रद्द करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे असाही आरोप त्यांनी केला आहे. अनेक वेळा मंत्र्यांची,अधिकाऱ्यांची भेट घेऊन पण तोडगा न निघाल्यामुळे सर्व कंत्राटदारांनी मंत्रालया समोर सामूहिक आत्मदहनाचा सरकारला इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रवाशांचे हाल, एसी लोकलमध्ये एसी बंद

News Desk

ठाणे | कांद्याचे व्यापारी अशोक चौधरी यांची 2 करोड 27 लाख रुपयांची फसवणुक

News Desk

मालगाडी घसरल्याने नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

News Desk
महाराष्ट्र

मराठा मोर्चाचे दुसरे पर्व

News Desk

उस्मानाबाद | मराठा आरक्षणाचे दुसरे पर्व सुरु करण्यात येणार असल्याचे आयोजकाने सांगितले आहे. त्यासाठी आज तुळजापुरात रॅली काढण्यात आली. आतापर्यंत मराठा मोर्चाने शांततेच्या मार्गाने ५८ विक्रमी मोर्चे काढले असून देखील अद्याप आरक्षण मिळाले नाही.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आयोगाने गती वाढवावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. यानंतर ३१ जुलैपर्यंत माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचे काय झाले, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आठवडाभरापुर्वी राज्य सरकारला केला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार आहे.

विनोद पाटील यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. की, मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापुर्वीच घेण्यात यावा. जेणे करून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

Related posts

भाजपने देशात बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसला! – उद्धव ठाकरे

Aprna

‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

News Desk

अधिवेशन संपण्यापूर्वी कलम ३५३ विषयासंदर्भात बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Aprna