HW News Marathi
मुंबई

डबलडेकर बस लवकरच होणार इतिहासजमा

मुंबई | मुंबईच्या आकर्षणात महाराष्ट्राला स्वत:ची वेगळी ओळख असणारी डबल डेकर बस आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. या बसच्या देखभालीसाठी येणारा अधिक खर्च आणि मुंबईच्या रस्त्यांवरील अपुरी जागा, यामुळे ही बससेवा बंद करण्याचा निर्णय बृह्नमुंबई इलेक्ट्रीक सप्लाय आणि ट्रान्सस्पोर्ट म्हणजेच ‘बेस्ट’ने घेतला आहे. सध्याच्या बसच्या तुलनेत या बसच्या देखभालीसाठी दुप्पट खर्च येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ऑक्टोबर २०२३ पर्यंत ही बससेवा बंद होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बेस्ट ची पहिली बस १५ जुलै १९२६ मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली. आणि वाढत्या गर्दीची गरज ओळखून डबलडेकर बस १९३७ मध्ये सुरू झाल्या. मुंबईतील या डबलडेकर बस आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. डबल डेकरला मराठीत दुतळी जनिका असेही म्हणतात. पण नेमहनीच्या वापरात डबलडेकर हा शब्द सोयीस्कर पडतो.

बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि मुंबई नगरपालिका यांमध्ये “बॉम्बे ट्रामवे १८७४” नावाचा करार झाला. त्यानुसार कंपनीला घोड्यांनी ओढायच्या ट्राम चालवण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर १९०५ मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी लिमिटेड हिने बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेतली आणि मुंबईच्या रस्त्यांवरून विजेवर चालणार्‍या ट्राम धावू लागल्या व नंतर जास्त गर्दी होत असल्याने १९२० मध्ये डबलडेकर ट्राम चालवायला सुरुवात केली.

बसची देखभाल आणि परिवहन खर्च जास्त

मुंबईत सध्या बेस्टकडून धावणाऱ्या बसेसच्या तुलनेत या डबलडेकर बसची देखभाल आणि परिवहन खर्च जास्त आहे. त्यामुळे ही बस सुरू ठेवणे सध्या बेस्टसाठी आव्हानात्मक बनले आहे. सन १९३७ साली या बसेस लोकप्रिय बनल्या होत्या. तर मुंबईची एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यातही या डबल-डेकर बसेसचा मोठा वाटा आहे. मराठी आणि हिंदी सिनेमाच्या माध्यमातूनही या बसेस महाराष्ट्र आणि देशभर पोहोचल्या. तर आजही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी या बसेस एक विशेष आकर्षण ठरत आहेत.

ऑक्टोबर २०२३ पर्यंतच सुरू राहतील ४८ बस

मुंबईत सुरुवातीला सन १९४७ ते ४८ दरम्यान १४१ डबलडेकर बस धावत होत्या. त्यानंतर १९९३ साली या बसची संख्या ८८२ इतकी करण्यात आली. मात्र, मुंबईच्या वाहतुकीत झालेला मोठा बदल, खासगी वाहतूक आणि जागेची मर्यादा असल्याने सद्यस्थितीत बेस्टकडे केवळ १२० डबल डेकर बसेस आहेत. विशेष म्हणजे सध्या मुंबईतील ७ मार्गांवरच या बसेस धावत आहेत. त्यापैकी डिसेंबर २०२० पर्यंत ७२ बस बंद करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ४८ बस ऑक्टोबर २०२३ पर्यंतच सुरू राहतील, असे बेस्टमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ऑक्टोबर २०२३ नंतर मुंबईची विशेष ओळख असणारी डबल-डेकर बस इतिहास जमा होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सी’ वॉर्ड मधील ए.पी मंडईची जागा घशात घालण्याचा बिल्डरचा डाव

News Desk

शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉनचे आयोजन

swarit

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांच्या फरकासह मिळणार सातवा वेतन आयोग

News Desk