HW News Marathi
मुंबई

बेस्टच्या संपाचा आठवा दिवस, आज पुन्हा उच्च न्यायायलात सुनावणी

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज (१५ जानेवारी) आठवा दिवस आहे. या प्रकरणी काल (१४ जानेवारी) बेस्टच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली होती. यानंतर बेस्ट संपावर आमच्या आदेशानंतरही तुम्ही संप सुरूच ठेवाल हे आम्हाला अपेक्षित नव्हते, अशा शब्दा मुंबई उच्च न्यायालयाने काल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे संपावर आज तरी तोडगा निघणार की न्यायालयाला आदेश द्यावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या आठवड्यात बेस्टच्या ३२ हजार कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. त्यामुळे बेस्टच्या ३ हजार ७०० बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत. या संपाविरोधात व्यवसायाने वकील असलेल्या दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयासमोर सोमवारी (१४ जानेवारी)ही तोडगा निघू शकला नाही. परंतु कामगारांच्या संपाच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संप हा कुठल्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पित्याला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला अद्दल घडविण्यासाठी अमदाराची अनोखी शक्कल

News Desk

प्रभाग क्रमांक 56 मध्ये महिला पत्रकार दीप्ती यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा

News Desk

ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

News Desk