मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून मजुरांना मदत केलेल्या सोनू सुदवर टीका केली आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा आणि टीका सुरू झाल्या आहेत. भाजपच्या तसेच मनसेच्या नेत्यांनी देखील संजय राऊत यांना सडेतोड उत्तर तर दिलेच आहे पण सवालही विचारला आहे.
अशातच, मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी सोनू सुदवर केलेल्या टीकेला विरोध करत सोनू सुदला आणि त्याच्या कार्याला पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, सोनू सूद हा माझा गेली अनेक वर्ष मित्र आहे. आणि मजुरांप्रती त्याला किती आपुलकी आहे हे सर्वांना माहीतच आहे. त्याने केलेली कामगिरी ही उत्तम आहे . तसेच, त्याने केलेल्या मदतीच्या काळात मी स्वतः देखील त्याला मदत आणि पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या सगळ्याचे राजकारण करू नका, असा अप्रत्यक्ष रित्या अस्लम शेख यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
तसेच, या आधी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देखील ट्विट करत सोनू सूद करत असलेल्या कामगिरीचे कौतुक केले होते. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी देखील स्वतः सोनू सूद याची भेट घेतली होती. यावरून हे नक्कीच लक्षात येईल की महविकास आघाडी सरकारमध्ये या एका मुद्द्यावरून मतभेद असलेले दिसून येते आहेत. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोनू सूद याने केलेल्या कामगिरीला पाठिंबा देत आहेत कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना सोनु सुदच्या कामामागे भाजपचा हात असल्याचा आरोप करत आहे
@SonuSood is my
friend for years together. His sympathies for the #MigrantWorkers is well known to all his near and dear ones. Most of the time I’ve personally supported and helped him in this mission to transport the #migrants for free. Let’s not politicise the good gesture.— Aslam Shaikh, INC 🇮🇳 (@AslamShaikh_MLA) June 7, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.