HW News Marathi
मुंबई

दूरदर्शन केंद्राच्या दुसऱ्या मजल्याला आग,अर्ध्या तासातच आग नियंत्रणात

मुंबई | गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आगीचे सत्र अजूनही सुरूच आहे. वरळीच्या दूरदर्शन केंद्राला आज (२० डिसेंबर) सकाळी दुसऱ्या मजल्याला आग लागल्याची माहिती मिळाली. या आगीनंतर एकच धावपळ उडाली. या आगीमुळे एफएमचे प्रसारण तात्काळ बंद करण्यात आले. परंतु अर्ध्या तासाच्या आत ही आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला.

आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर युद्धपातळीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दूरदर्शन केंद्रातील दुसऱ्या मजल्याचे बरचसे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाजातून माहिती मिळाली असून अधिक तपास सुरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तीन वर्षांत राज्यात शालेय शिक्षणाची घसरण

News Desk

राज्यात पुढील दोन वर्षात ७२ हजार जागांवर नोकरभरती

News Desk

गुढीवाडव्याच्या मुर्हूतावर राज्यभरात प्लास्टिक बंदी

News Desk