HW News Marathi
मुंबई

बाप्पाच्या दर्शनापासून भाविक पाच दिवस वंचित

मुंबई – मुंबईकरासाठी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील श्रींच्या मुर्तीचे दर्शन करणे जणू दिनक्रम झाला आहे. पण, येत्या पाच दिवसात बाप्पाच्या दर्शनापासून भाविकांना वंचित राहवे लागणार आहे. दरवर्षी सिद्धिविनायक च्या मुर्तीला माघी गणेशोत्सव निमित्ताने सिंदूर लेपन केले जाते.

त्यामुळे मंगळवारपासून पाच दिवस म्हणजे १० जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान भाविकांना बाप्पाच्या मुर्तीचे थेट दर्शन घेता येणार नाही. सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि अभिनेता आदेश बांदेकर यांनी माहिती दिली आहे.

या काळात भाविकांना गणपतीच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येईल सोमवारी १५ जानेवारी रोजी गणेशमुर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार असल्याचे आदेश बांदेकर यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहिकाला तीन गोविंदांच्या जीवावर!

News Desk

दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या हत्येच्या कटप्रकरणी प्रिती जैनसह दोघं दोषी

News Desk

अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सलमान खानविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

News Desk