HW News Marathi
मुंबई

सरकार उलथविण्याचा माओवाद्यांचा होता कट

मुंबई| देशभरात कथित माओवाद्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करताना पोलिसांनी माओवाद्यांचा सरकार उलथविण्याचा मोठा डाव होता असा गौप्यस्फोट केला आहे. शुक्रवारी मुंबईत पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला आहे. सदर पत्रकार परिषदेत पोलीस महासंचालकांनी ज्यांना अटक करण्यात आली आहे त्या संदर्भातील विविध पुरावे प्रसार माध्यमांसमोर ठेवले आहेत.

पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तेलुगू कवी वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वर्नण गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली आहे. ही अटक अत्यंत योग्य होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला, असेही यावेळी बोलताना पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

बंदी असलेल्या नक्षली संस्थांशी संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी देशभरात नऊ ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये हजारो संशयित कागदपत्रे, कंप्युटर्स आणि लॅपटॉप पासवर्डसह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशीही ऐतिहासिक वाढ

News Desk

लालबागमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट २० जण जखमी

News Desk

महाराष्ट्रातील पेंशनरचे आझाद मैदान येथे धरणे आंदोलन

swarit
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव दंगलीबाबत नवा खुलासा

News Desk

मुंबई | भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र नाही, तर देश हदरुन गेला होता. कोरेगाव भीमा दंगल भडकविण्यासाठी पाच लाख रुपये दिल्याचा उल्लेख एका पत्रात आहे. महाराष्ट्र अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदे घेऊन माओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भीमा-कोरेगाव भडकविण्यासाठी पाच लाख रुपये दिल्याचा उल्लेख नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे यांनी रोना विल्सन याला लिहिलेल्या पत्रामध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, देशात अराजकता निर्माण करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी दुसऱ्या देशातील शक्तींची मदत घेण्याच्या हालचालीही सुरू होत्या, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले आहे.

पंतप्रधानांच्या हत्येचा कट

भीमा-कोरेगाव दंगलसंदर्भात पुणे पोलिसांनी गेल्या दोन दिवासांपूर्वी देशभरात धाडी टाकल्या होत्या. या पाच व्यक्तींच्या घरी छापे टाकल्यानंतर तपासात मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती. बंदी असलेल्या माओवादी संघटनांनी या कार्यकत्यांचा संबंध असल्याचे माहितीच्या आधारावर पुणे पोलिसांनी कवी वरावरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली.

 

 

Related posts

नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावा?, नितेश राणेंचा रोहित पवारांना टोला

News Desk

अनिल देशमुखांच्या पत्नीला आता ED चं समन्स, चौकशीसाठी लावावी लागणार हजेरी

News Desk

नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार!, राज्य शासनाचा निर्णय

News Desk