HW News Marathi
मुंबई

हुक्का पार्लरमध्ये तरुणाची हत्या, मलाकाचा तरुणीवर बलात्कार

मुंबई- गोरेगावमधील रॉयल हुक्क पार्लर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोलिसांनी रॉयल हुक्का पार्लरच्या मालकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हुक्का पार्लरमध्ये गेल्या आठवड्यात एका तरुणी हत्या झाली होती. या घटनेनंतर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. हुक्का पार्लरचा मालक नासिर अन्सारी हा फरार आहे. आरोपी नासिर अन्सारीच्या विरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 वर्षीय पीडितेने सांगितले की, नासिर याने तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. नंतर लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. नासिर विरोधात बलात्कार आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, रॉयल हुक्का पार्लरमध्ये गेल्या आठवड्यात रविवारी (22 आॅक्टोबर) मयूर पांचाळ (वय-26) या तरुणााची हत्या झाली होती. हुक्का पार्लरमध्ये शुल्लक कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात मयूरी ही गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी 11 जणांना अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या या वर्षातला शेवटचा मेगाब्लॉक 

News Desk

Dahi Handi | नयन फाउंडेशनच्या गोविंदांची आयडीयलच्या दहीहंडीला सलामी

News Desk

लोकल ट्रेनमधून ६ वर्षात तब्बल ६० हजार मोबाइल लंपास

News Desk