HW News Marathi
मुंबई

मुंबई उपनगरामध्ये डायग्नोस्टिक सेंटर्सच्या संख्येत होणार वाढ

मुंबई | उपनगरात राहणा-या मुंबईकरांना येत्या काळात पॅथॉलॉजी सेंटर्ससाठी धावपळ करावी लागत होती. पण, त्यांची पॅथॉलॉजीसाठी होणारी शोधाशोध आणि धावाधाव लवकरच थांबणार आहे. एसआरएल डायग्नॉस्टिक्स या डायग्नॉस्टिक चैनने पॅथॉलॉजी सेंटर्सच्या संख्येत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या तीन महिन्यांत मुंबई उपनगरांमध्ये ही पॅथॉलॉजी सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना याचा अधिक फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्याच्या पॅथॉलॉजी सेंटर्सच्या तुलनेत हे जाळे दुप्पट असणार आहे. त्यानुसार खार पश्चिम, ठाणे पश्चिम, मुलुंड पश्चिम, कांदिवली पश्चिम व नवी मुंबई या मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी नवी केंद्रे सुरू करण्याच्या येणार आहेत. या नवीन पॅथॉलॉजी सेंटरमध्ये अत्यंत अनुभवी पॅथॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली ३५०० हून अधिक चाचण्या केल्या जाणार आहेत. या केंद्राच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आल्याने मुंबईतील लाखो रहिवाशांना सेवा देण्याची क्षमता अनेक पटीने वाढली आहे. ही प्रमुख केंद्रे सुरू करण्यात येणार आल्याने एसआरएलच्या मालकीची शहरातील पॅथॉलॉजी सेंटर संख्या सध्या २५ एवढी झाली आहेत.

भारतात क्लिनिकल डायग्नॉस्टिक क्षेत्रामध्ये एसआरएल एक द्रष्टी कंपनी आहे. “एसआरएलने मुंबई शहरातूनच वाटचाल सुरू केलेली असल्याने कंपनीच्या दृष्टीने हे शहर खास आहे. गुणवत्ता व पॅथॉलॉजी सेवांची उपलब्धता या समस्या हाताळण्याचा विचार करता, कंपनीच्या प्रगतीविषयक योजनेच्या दृष्टीने दुप्पट विस्तार अतिशय योग्य आहे.” असे एसआरएल डायग्नॉस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम हलदर यांनी म्हटले आहे.

एमआरएल सध्या ३७६ प्रयोगशाळांच्या व ६३००कलेक्शन पॉइंटच्या माध्यमातून दररोज अंदाजे १. २५ लाख चाचण्या करते. दुबई, श्रीलंका व नेपाळ येथे कंपनीच्या मोठ्या लॅब आहेत आणि अन्य देशांत अंदाजे ७० कलेक्शन पॉइंट आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

News Desk

मुंबईतल्या ५०० फुटांपर्यतच्या घरांना करमाफी

News Desk

पूर्व उपनगरांमधील उड्डाणपूलांखाली साकारणार ९ उद्याने

News Desk