मुंबई | मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. शनिवारी(१५ डिसेंबर) सकाळी ६.०५ मिनिटांनी या विमानाचे उड्डाण होणार होते. परंतु बॉम्बच्या अफवेमुळे विमानाचे उड्डान एक तास उशीराने झाले. या विमानात १६९ प्रवासी होते. विमानात बॉम्ब असल्याची अफवा ठरल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
#UPDATE Indigo: A passenger travelling with another private carrier told our staff at Mumbai airport that there could be a bomb on Mumbai-Delhi flight 6E 3612. The passenger was found to be mentally unsound. Operations have resumed however the flight was delayed by one hour. https://t.co/w9boiryekQ
— ANI (@ANI) December 15, 2018
शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर एका महिला प्रवाशाने इंडिगोच्या चेक-इम काइंटरवर जाऊन इंडिगोच्या मुंबई-दिल्ली ६ई ३६१२ विमानात बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले. यावेळी तिने काही लोकांचे फोटो दाखवून यांच्यापासून देशाला धोका असल्याचे सांगितले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव विमानातून प्रवाशांना उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली.
परंतु विमानात काहीही संशयास्पद आढळले नाही.विमानतळावरील सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी संबंधीत महिलेची चौकशी केली असता ती महिला मानसिक रुग्ण असल्याचे उघड झाले आहे. मात्र या सर्व गोंधळामुळे विमानाच्या उड्डाणाला एक तास उशीर झाला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.