HW News Marathi
मुंबई

सीएसटी कर्जत लोकलमध्ये गरोदर महिलेला मारहाण

गौतम वाघ

कल्याण गरोदर महिला लोकलमध्ये अपंगांच्या डब्यात बसल्याने तिला अपंगांचं कार्ड विचारत मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार मुंबईत घडलाय. काल सायंकाळी घाटकोपर स्थानकाजवळ हा प्रकार घडला, मात्र याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गांभीर्य न दाखवता फक्त एनसी दाखल केली आहे.

कल्याणच्या विठ्ठलवाडीला राहणारे दिनेश तिवारी यांची पत्नी ८ महिन्यांची गरोदर असून तपासणीसाठी तिला मुंबईच्या कामा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल संध्याकाळी डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिवारी आपल्या पत्नीला घेऊन सीएसटी स्थानकातून ७.०१ च्या कर्जत लोकलनं घरी येण्यास निघाले. मात्र कुर्ला स्थानकातून अपंगांच्या डब्यात चढलेल्या दोन धडधाकट प्रवाशांनी तिवारी यांच्या पत्नीला डब्यात पाहून तिच्याकडे अपंगांचं कार्ड मागितलं, मात्र तिनं आपण गरोदर असल्याचं सांगताच त्यांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी दिनेश तिवारी यांनी हस्तक्षेप केला असता त्यांना कपडे फाटेस्तोवर मारहाण करण्यात आली, तर त्यांची पत्नी त्यांना वाचवण्यासाठी मध्यस्थी केली असता तिच्याही पोटावर लाथा मारण्यात आल्याचा आरोप तिवारी यांनी केलाय. या दोघांचे चेहरे इतर प्रवाशांनी काढलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये स्पष्टपणे कैद झाले आहे . या सगळ्या प्रकारानंतर इतर प्रवासी आणि बाजूच्या डब्यातील प्रवाशांनी तिवारी यांची बाजू घेत या दोन प्रवाशांना दम भरला, तर तिवारी यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरून रेल्वे पोलीसांकडे तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना चार तास बसवून ठेवलं आणि त्यांची फक्त एनसी दाखल करून घेतली. गुन्हा नोंदवायचा असेल तर कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. मात्र झिरो नंबरने कुठेही एफआयआर दाखल करून घेता येतो, याचा कदाचित डोंबिवली रेल्वे पोलिसांना विसर पडला. पोलिसांनी तत्परता दाखवली असती, तर कदाचित कल्याण रेल्वे स्थानकातच या दोन मुजोर प्रवाशांच्या मुसक्या आवळता आल्या असत्या. यानंतर रात्री १२ च्या सुमारास तिवारी यांनी घर गाठलं, मात्र पत्नीला रात्रभर त्रास झाल्यानं रात्र जागून काढल्याचं त्यांनी सांगितलं.

डोंबिवली रेल्वे पोलिसांची हलगर्जी कारभाराची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ३ ऑक्टोबर रोजी डोंबिवली रेल्वे स्थानकात धीरज म्हसकर या तरुणाला मारहाण करण्यात आली होती, या प्रकाराचीही पोलिसांनी फक्त एनसीवर बोळवण केली होती. ना आरोपींचा पत्ता, ना प्रकरणाचा तपास. काम झटकणा-या या पोलिसांवर आता कारवाई होते का? आणि गरोदर महिलेला असंवेदनशीलपणे मारहाण करणा-या दोन प्रवाशांचा पोलीस शोध घेतात का? असा सवाल प्रवाशी करत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घराचे छत कोसळून मुलीचा मृत्यू

News Desk

‘दमण’च्या नागरिकाने रेल्वे मंत्र्यांना केले होते सावध

News Desk

पश्चिम रेल्वेची पावसाळ्यापुर्वी जय्यत तयारी

News Desk