HW Marathi
मुंबई

म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई । दिवाळीच्या मुहूर्तावर ‘म्हाडा’ने मुंबईत घर घेणार्यासाठी आनंदाची बातमी दिली आहे. १३८४ घरांच्या लॉटरीसाठीची आज(५ नोव्हेंबर) जाहिराती प्रसिद्ध झाली आहे. आजपासून घरासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी आज (५ नोव्हेंबरला) दुपारी दोन वाजल्यापासून अर्ज भरता येणार आहेत.

१० डिसेंबरला रात्री १२  वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तर १६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता १३८४ घरांसाठी सोडत निघणार आहे. म्हाडाने या वर्षी घरांसाठी किमतीचे नवीन धोरण तयार केले आहे. त्यानुसार म्हाडाच्या घरांच्या किमती यंदा २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. मुंबईतील ग्रांट रोडमध्ये म्हाडाच्या एका घराची किंमत ५ कोटी ८० लाखांवर आहे. तर सर्वात स्वस्त घराची किंमत १४ लाख ६२ हजार आहे.

 

Related posts

एल्फिन्स्टन पुलाचे उद्घाटन, मुख्यमंत्र्यांचा रेल्वेतून प्रवास

News Desk

मुंबईमध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात, कुर्ल्याच्या राजाचे जल्लोषात आगमन 

News Desk

मोदीविरोधात लिखाण करणे महागात, पोलीस निलंबित

News Desk