मुंबई | आयडियल आणि श्री साई दत्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने गेल्या ४१ वर्षापासून ‘दहीहंडी उत्सव’ मोठ्या उत्सहात साजरा करत आहे. या हंडीचे आयोजन दादर मधील छबिलदास रोड येथे असते.
आयडियलची दहीहंडी ही प्रसिद्ध आहे. ही दहीहंडीत महिला गोविंद पथकाला विशेष प्राधान्य दिले जाते. तसेच आयडियल नेहमीच सामाजिक भान राखून वेगवेगळा संदेश देणारी दहीहंडी म्हणून ओळखली जाते. यंदाची आयडियलची दहीहंडी ही इकोफ्रेंडली दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
महिला पथकांचे वर्चस्व
यंदाची इकोफ्रेंडली दहीहंडी ही विक्रोळीच्या महिला क्रीडा केंद्र या पथकाने पाच थर लावून आयडियलची मानाची दहीहंडी फोडली. या पथकाला महिला पथकाला प्रथम पोरितोषिक आणि कृष्णाच्या मुर्तीने त्यांचा गौरव करण्यात आला.
विक्रोळी क्रीडा केंद्राचा १५ वर्षाचा संघर्ष
विक्रोळी क्रीडा केंद्रा मंगळ गेल्य १५ वर्षापासून आयडियलची दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत होती. परंतु त्यांना अपयशचा सामना करावा लागत होता. परंतु यंदाच्या वर्षी या महिला पथकाने आयडियलची दहीहंडी फोडून त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.