HW News Marathi
मुंबई

घाटकोपरमध्ये मनसेची पोस्टरबाजी, राम कदम यांची उडवली खिल्ली 

मुंबई | प्रजा फाउंडेशनने दोन दिवसांपूर्वी मुंबईतील आमदाराचं रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केले. 2016 ते 2017 दरम्यान चार अधिवेशनातली आमदारांच्या कामगिरीची नोंद प्रजा फाऊंडेशनने घेतली आहे. या अहवालानुसार, काँग्रसचे मुंबईतील आमदार अमिन पटेल यांचा पहिला क्रमांक लागतो तर भाजपचे आमदार राम कदम ३२ व्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर आहेत. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांची खिल्ली उडवत अभिनंदन करणारे फ्लेक्स घाटकोपरच्या चौकाचौकात तसेच त्यांच्या घरासमोर लावले आहेत.
प्रजा फाऊंडेशनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मुंबईतील आमदारांच्या कामगिरीच्या अहवालात घाटकोपर पश्चिममधील भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांना शेवटचे ३२ वे स्थान देण्यात आले आहे. आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाचाही या फ्लेक्समध्ये संदर्भ देण्यात आला आहे. विभागात विकास कामे होत नाहीत, असे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले असून, राम कदम यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी फ्लेक्स लावल्याचं मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयसीआसीआय बँकेच्या संचालक आणि सीओओ पदावरुन चंदा कोचर यांची उचलबांगडी

News Desk

देशात लोकशाही धोक्यात – जावेद अख्तर

News Desk

साडेपाच वर्षाच्या मुलाला सावत्र बापाने दिले चटके

News Desk