HW News Marathi
मुंबई

परमबीर सिंह का नाही बनले मुंबईचे पोलीस आयुक्त ?

मुंबई | महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथुर शनिवार ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. मुंबई पोलिसांनी मोठ्या थाटामाटात नायगावच्या पोलीस मैदानात माथुर यांच्या निवृत्ती निमित्त निरोप संमारंभ केला. माथुर यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे सध्याचे आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती पोलीस महासंचालक म्हणून करण्यात आली. तर पडसलगीकरांच्या जागेवर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण असणार याची एक वेगळी चुरस पहायला मिळाली. गेल्या काही दिवसात रॉ’चे वरिष्ठ अधिकारी सुबोध जयस्वाल, राज्य गुप्तचर आयुक्त संजय बर्वे, ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चा सुरु होती. अखेर शनिवार ३० जून रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सुबोध जयस्वाल यांच्या नावावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले.

मुख्यमंत्र्यांकडे गृहाखाते असल्यामुळे त्यांनी रॉ’चे वरिष्ठ अधिकारी असलेल्या सुबोध जयस्वाल यांच्यावर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोपवला आहे. परंतु सुबोध जयस्वाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची नियुक्ती न झाल्यामुळे यावर विविध प्रकारच्या चर्चांना सध्या उधान आले आहे. अनेकांनी परमबीर सिंग यांची नियुक्ती न होण्यामागे साध्वी प्रज्ञा सिंग (मालेगाव बॉंम्बस्फोट प्रकरण) कारण आहे असे म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या मालेगाव बॉंम्ब स्फोट प्रकरणानंतर हिंदूच्या संघटनांच्या असलेल्या दबावामुळे मुंबई पोलीस आयुक्त पदाला परमबीर सिंह मुकले असल्याची सध्या चर्चा आहे. सरकारवर असलेल्या दबावामुळे परमबीर सिंग यांच्या नावाला मुख्यमंत्र्यानी परवानगी दिली नसल्याचे सध्या बोलले जात आहे. परंतु मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या ठाणे शहरात पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर परमबीर सिंह यांनी अनेक महत्वाची प्रकरणे हाताळली आहेत.

परमबीर सिंह यांचा कार्यकाळ खालील प्रमाणे

  • १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
  • मुंबईमध्ये एसआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक म्हणून काम
  • एटीएसचे अतिरिक्त आयुक्त
  • मार्च २०१४ ला ठाणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला
  • सद्या ठाणे शहराचे पोलीस आयुक्त

परमबीर सिंह यांनी हाताळलेली महत्वाची प्रकरणे :

ममता कुलकर्णी ट्रग्स प्रकरण – १८ जून २०१६

२००० कोटी रुपयांच्या ट्रग्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीला दोषी ठरवले. ममता कुलकर्णी विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. या प्रकरणात तिला अटक वॉरंट देखील जारी करण्यात आले होते.

सैन्य भरती पेपर फुट प्रकरण- २ मार्च २०१७

परमबीर सिंह ठाणे पोलीस आयुक्त असताना लष्कर भरती परीक्षेच्या पेपर फुट प्रकरणाचा त्यांनी पडदा फाश केला. या प्रकरणात लष्कराचे तीन क्लर्क मास्टरमाईंड असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात ठाणे क्राइम ब्रांचकडून देशभरात मोठी कारवाई करण्यात आली होती.

ठाण्यातील अनधिकृत टेलिफोन एक्सेंजचा पर्दाफाश- १८ मे २०१७

सर्व सरकारी यंत्रणांना अंधारात ठेवून ठाण्यात चोरीछुपे अनधिकृत टेलिफोन एक्सेंज सुरू करण्यात आले होते. ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने या अनधिकृत टेलिफोन एक्सेंजचा पर्दाफाश केला असून ४ जणांना अटक केली आहे. कुणालाही कानोकान खबर न लागू देता आरोपींनी इंटरनॅशनल कॉल करण्याची यंत्रणा उभी केली होती. त्यामुळे या टेलिफोन एक्सेंजचा वापर देशविघात कृत्यासाठी तर करण्यात येत नव्हता ना, याचा पोलीस तपास करत आहेत. या अनधिकृत टेलिफोन एक्सेंजमुळे सरकारचा ३० कोटींचा महसूल बुडाल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. विशेष म्हणजे, सुरक्षा यंत्रणेला ट्रेस करता येऊ नये, यासाठी आंतरराष्ट्रीय कॉल व्हीओआयपीद्वारे कॉल प्राप्त करत होते. त्यानंतर बनावट एक्सेंजद्वारे तो कॉल डोमेस्टिक कॉलमध्ये ट्रान्सफर करून इच्छित भारतीयच्या लॅंण्डलाईन किंवा मोबाईलशी जोडला जात होता.

अब्दुल कासकरला अटक – १८ सप्टेंबर २०१७

दाऊद इब्राहिमचा भाऊ अब्दुल कासकरला अटक. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या कार्यकाळात कासकरला अटक करण्यात आली. नागपाड्यातून हसीना पार्कच्या घरातून रात्री ९ च्या सुमारास फिल्मी स्टाइलमध्ये अचानक छापा टाकून केली होती अटक. खंडणीच्या रॅकेटमध्ये हात असल्यामुळे केली होती अटक.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलुंडमध्ये सिलिंडर स्फोटामुळे आग

News Desk

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटुंचे हाल-बेहाल

swarit

ठाणे सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक

News Desk