HW Marathi
मुंबई

नौदलाच्या गार्डची गोळी झाडून आत्महत्या

मुंबई | नौदलातील एका गार्डने स्वतःजवळी असलेल्या एसएलआर मधून गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची घटना घडली ट्रॉम्बे येथे घडली आहे. केशर सिंग (५६) असे या नौदलाच्या गार्डचे नाव आहे. या घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून केशर यांचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

सिंग हा पंजाबचा राहिवासी असून मुंबईत ट्रॉम्बे येथील वॉच टॉवरवर गार्डची ड्युटी करत होते. सिंग यांना १५ दिवसांची सुट्टी काढून शुक्रवारी  (११ जानेवारी) पंजाब येथील त्यांच्या घरी जाणार होते. परंतु घरी जाण्याआधी गुरुवारी (१० जानेवारी) ऑनड्युटी असताना स्वतःच्या एसएलआर या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिंग हे ऑक्टोबर महिन्यापासून वॉच टावरवर एकटेच कार्यरत होते. सिंग यांनी आत्महत्या केल्यावर घटनास्थळाहून कुठलीही सुसाईट नोट सापडलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून अधिक तपास सुरू आहे.

 

Related posts

आर. के. स्टुडिओच्या आगीची ही आहेत खरी कारणे

News Desk

राज ठाकरे होणार सक्रीय पुन्हा नव्या जोमाने मैदान गाजवण्यास सज्ज…!

Kiran Yadav

राणेंना आता काहीच मिळणार नाही | आठवले

News Desk