HW Marathi
मुंबई राजकारण

कुर्ल्यात महापालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे रास्तारोको आंदोलन

मुंबई | कुर्ल्यातील सीएसटी रोडवर रहिवाशांना पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी अनेकदा तक्रार करूही महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने बुधवारी (१० जुलै) अखेर राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी कुर्ल्यात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले आहे. कुर्ला मिठी नदी परिसरात विविध कामे करण्यात येत असल्याचे जरी सांगण्यात येत असले तरीही मिठी नदीला लागून असलेल्या कपाडिया नगर, सीएसटी रोड साचणाऱ्या पावसामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या ३ वर्षांपासून पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप डॉ. सईदा खान यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात मुंबई झालेला मुसळधार पावसादरम्यान कपाडिया नगरमधील १०० हूनही अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. इतकेच नव्हे तर या विभागात मलनिस्सारण वाहिन्या, फुटपाथ नसल्याने येथील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याबाबतीत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून याची दखल घेण्यात आली नाही.

Related posts

#Vidhansabha2019 : आदित्य ठाकरेंची संपत्ती जाहीर

News Desk

राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढणार ?

News Desk

नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, ५२ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार

News Desk