HW News Marathi
मुंबई

१५ एप्रिलला रेल्वे सुरु होणार का? यावर रेल्वे प्रशासनाने दिले उत्तर

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. देशाच्या सर्व सीनाही बंद करण्यात आल्या आहेत. कोणत्याही वाहनांना रस्त्यावर विनाकारण येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे त्यानंतर १५ एप्रिलपासून रेल्वे सुरु होणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र रेल्वेने याचे स्पष्टीकरण दिले आहे. १५ एप्रिलपासून देशात रेल्वे सेवा पुन्हा सुरु होईल अशा चर्चा सुरु होत्या, पण रेल्वे मंत्रालयाने यावर स्पष्ट नकार दिला आहे.

रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांनी काल (३ एप्रिल) व्हिडिओ कॉन्फ्ररेंसिंग बैठकीत सांगितले की, सरकारकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतरच रेल्वे सेवा सुरु होईल. सरकारने याबाबत काही मंत्र्यांची समिती बनवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण रेल्वे सेवा देखील बंद करण्यात आली. रेल्वेने २१ दिवसांसाठी १३,५२३ ट्रेन रद्द केल्या होत्या. फक्त मालगाड्या सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे विभागप्रमुखावर हल्ला करणा-यांना अटक

News Desk

डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोडण्यास सांगितल्यास होणार कारवाई

swarit

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ज्येष्ठ मतदारांनी ‘या’ उपक्रमातंर्गत केले मतदान

Aprna