HW News Marathi
मुंबई

रस्त्यात खड्डे खड्ड्यात ‘पेव्हर ब्लॉक’

मुंबई | रस्त्यांत खड्डे की खड्यात रस्ते अशी अवस्था मुंबईतील अनेक रस्त्यांची आहे. नुकत्याच सुरू झालेल्या पावसाने यंदा मुंबईतील ठिकठिकाणच्या रस्त्यांची अशी दैना करून टाकली आहे. फूटपाथच्या बाजूला अवैधरित्या पार्किंग तर रस्त्यांवर खड्डे आणि त्यातून चिखल अंगावर उडवत वेगाने जाणारी वाहने यामुळे चालायचे तर कुठून या प्रश्नाने मुंबईकर हैराण झाले आहेत.

मुंबईत पावसाच्या दिवसांमध्ये रस्त्यात खड्डा की खड्डयांत रस्ता हा संशोधनाचा भाग बनतो. पण यावर पालिकेने नवा मार्ग शोधून काढला आहे. यंदा रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांना डांबर किंवा रेती सिमेंटने न बुजवता चक्क पालिका कर्मचाऱ्यांनी पेव्हर ब्लॉकने हे खड्डे बुजवले आहेत. कुर्ला, सायन, घाटकोपर, पवई अश्या अनेक ठिकाणी आपल्याला असे नवीन रस्ते पाहायला मिळतील. आणि खड्डे बुजवण्याच्या नावाखाली पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात. हे सर्व दरवर्षी गणरायाच्या आगमनापूर्वी खड्डय़ांचा प्रश्न चर्चेत येतो आणि नंतर सर्वानाच विसर पडतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओला-उबेर चालक असंख्य मागण्यासाठी रस्त्यावर, बेमुदत बंदचा इशारा

swarit

कोपर रेल्वे स्थानकात टीसीला मारहाण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

News Desk

नक्षल समर्थकांच्या अटकेसंदर्भात महाराष्ट्र पोलिसांची पत्रकार परिषद

News Desk