HW News Marathi
मुंबई

माहिती देण्यास टाळाटाळ, मुंबई विद्यापीठाला २५ हजार रुपयांचा दंड

मुंबई । मुंबई विद्यापीठाकडे माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणे महागात पडले आहे. मुंबई विद्यापीठाकडे २०१० ते २०१७ दरम्यानच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मुंल्याकनासाठी घेण्यात आलेली रक्कम आणि होणारा खर्च याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी आकाश वेदक याने मागितली होती. मात्र, विद्यापीठाकडून ही माहिती न मिळाल्याने एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा माहिती मागविण्यासाठी आकाशने राज्य माहिती आयोगाकडे अपील केले.

तरीही मुंबई विद्यापीठाने माहिती दडवल्याने राज्य माहिती आयोगाने २५ हजार रुपयांचा दंड मुंबई विद्यापीठाला ठोठावला आहे. तसेच कुलगुरुंना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. मुंबई विद्यापीठ पुनर्मुंल्याकनासाठी कोट्यवधी रुपये विद्यार्थ्यांकडून घेते. मात्र पुनर्मुंल्याकन आणि फोटोकॉपीसाठी होणारा खर्च लाखांमध्ये आहे. मग बाकीचे पैसे कुठे जातात? असा प्रश्न अनेक विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चर्चगट स्टेशनजवळ हॉर्डिंग कोसळून एका वृद्धाचा मृत्यू

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांची बैठक निष्फळ, संप सुरूच

News Desk

ब्रेकिंग | भिवंडीत ऑईल गोदामाला भीषण आग

News Desk
राजकारण

राज ठाकरे साधणार उत्तर भारतीयांशी संवाद

News Desk

मुंबई | नेहमीच उत्तर भारतीयांच्या विरोधात उभे राहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी (२ डिसेंबर) प्रथमच उत्तर भारतीयांच्या मंचावर जाणार आहेत. उत्तर भारतीयांच्या प्रश्‍नांना उत्तरे देत ते थेट संवाद साधणार असल्याने कांदिवलीत होणार्‍या या सवाल-जवाबाकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

कांदिवलीतील युवा छात्र महापंचायत संमेलनाच्या निमित्ताने राज आणि उत्तर भारतीय असा हा सवाल-जवाब तथा संवादाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रमत कांदिवली पश्चिम येथील भुराभाई हॉलमध्ये सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यावर काय बोलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पश्चिम उपनगरांतील मालाड, कांदिवली आणि बोरिवली या तिन्ही विभागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय वास्तव्याला आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्षाचालक, फेरिवाले स्थायिक आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उत्तर भारतीय यांची मते मिळविण्यासाठी राज ठाकरे या कार्यक्रमता सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

मुंबईतील मराठी-उत्तर भारतीय यांच्यामधील गैरसमज दूर करण्यासाठी या पंचायतीचे आयोजन केले आहे. उत्तर भारतीय नेते भडकावू भाषण करून जातात, परंतु त्यांचा फटका सामान्य उत्तर भारतीयांना बसतो. हे कुठेतरी थांबावे आणि खरी माहिती उत्तर भारतीय आणि मराठी माणसाला कळावी, या उद्दशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले जाते.

 

Related posts

मोदी सरकारने देशाच्या हिताच्या दृष्टीने चांगले काम केले | शिवसेना

News Desk

येत्या तीन दिवसांत कर्नाटकात भाजपचे सरकार येईल, राम शिंदेंचा दावा

News Desk

कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वैचारिक वारसदार !

News Desk