HW News Marathi
मुंबई

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई | भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर पालघर लोकसभा मतदार संघात येत्या २८ मे रोजी निवडणूका होत आहेत. २८ मे री होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या दिवशी होणाऱ्या सर्व परीक्षा मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी विद्यापीठाच्या या जिल्ह्यात सात परीक्षा होणार होत्या. त्या आता २८ मे ऐवजी २ जून रोजी होतील, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्र परीक्षा सध्या संलग्नित कॉलेजांमध्ये सुरू आहेत. यात मुंबई आणि कोकणासह पालघर जिल्ह्यातील कॉलेजांतही परीक्षा होणार आहेत. परंतु लोकसभा पोटनिवडणुकीमुळे बहुतांश महाविद्यालये पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्र म्हणून देण्यात आली आहेत. तसेच मतदान करणा-या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

कोणत्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत

मुंबई विद्यापीठा द्वारे २८ मे रोजी होणा-या परिक्षांमध्ये टीवाय बीकॉम वार्षिक पॅटर्न, एमकॉम सेमिस्टर दोन, एम.सी.ए. सेमिस्टर दोन, बी.ई. सेमिस्टर आठ, एसई सेमिस्टर तीन, बीकॉम सेमिस्टर पाच आणि बीकॉम अकाउंट्स अँड फायनान्स या परीक्षांचा समावेश होता. या परिक्षा लोकसभा पोटनिवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने वेबसाइटद्वारे जाहीर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत आजचा पारा 13.8 अंशावर पोहोचला

Aprna

भाजपकडून सतत ऑफर – नारायण राणे

News Desk

बाप्पाच्या मुर्ती साकारण्यास सुरुवात , आदिवासी मुलांना रोजगार

swarit