HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेच्या मोटरमन्सचा ओव्हरटाईम करण्यास नकार

मुंबई | शुक्रवारी (आज) कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरम्यांचे हाल झाले आहेत. कारण मध्य रेल्वेच्या मोटरमन्सनी ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्यामुळे सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान ९ लोकल ट्रेनच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मोटरमनच्या रिक्त जागा भरण्यासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी या बैठकीत रेल्वेच्या अधिकारी आणि मोटरमन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. परंतु ही बैठक निष्फळ ठरल्याने आज सकाळी मोटरमन्सनी ओव्हरटाईम करण्यास नकार दिला आहे.

मोटरमनच्या रिक्त जागा त्वरी भरणे, सिग्नल ओलांडल्यास सेवेतून कमी करण्याची शिक्षा रद्द करा, या मोटरमन्सच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी मोटरमन्सनी ओव्हरटाईम न करता केवळ नियमित वेळेत काम करण्याचे मध्य रेल्वे मजदूर संघाने जाहीर केले आहे.२६ मोटरमनवर होणारी कारवाई त्वरित मागे घ्यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली असून मोटरमनचे हे आंदोलन सुरू राहिल्यास मुख्य, ट्रान्स हार्बर, हार्बरच्या सुमारे ६०० लोकल फेऱ्यांना फटका बसणार आहे. मध्य रेल्वेवर मोटरमनच्या जवळपास २८३ जागा रिक्त आहेत

आज दुपारी पुन्हा एकदा रेल्वेचे अधिकारी आणि मोटरमन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार आहे. बैठकीत ठोस आश्वासन मिळेत नाही तोपर्यंत ओव्हरटाईम करण्यास मोटरमननी नकार दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१ ऑक्टोबरपासून राजभवन भेट पुन्हा सुरु

Manasi Devkar

स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट फेस्टिवल

News Desk

शितल म्हात्रे यांना धमकावल्या प्ररकणी दोघाना अटक

News Desk