HW News Marathi
मुंबई

साईच्या मुलांनी हसत खेळत अभ्यास करण्याचे धडे गिरवले

मुंबई | सोशल ऍक्टिव्हीटिज इंटिग्रेशन अर्थात साई संस्थेतर्फे देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी ‘हसत खेळत अभ्यास कसा करावा?’ या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. युवा प्रेरक वक्ता आणि प्रशिक्षक अक्षय ढमाल यांनी या कार्यशाळेस मार्गदर्शन केले. यावेळी साई संस्थेचे संचालक विनय वस्त, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे संस्थापक दयानंद कुबल, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे व्यवस्थापक विनय बेटकर, साई संस्थेचे व्यवस्थापक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अक्षय ढमाल यांनी सुरुवातीलाच मुलांना त्यांच्या आवडीचं चित्र काढावयास सांगितले. उपस्थित मुलांपैकी ६० टक्के मुलांनी आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजाचे चित्र काढले. “मी अनेक शाळेतील मुलांना प्रेरणादायी प्रशिक्षण दिले आहे. त्यावेळेस चित्र देखील काढावयास दिले. मात्र पहिल्यांदाच आपल्या देशाविषयी चित्रांतून प्रेम व्यक्त करणारी मुले पाहिली. या मुलांना भविष्यात सैन्यदल, पोलीस दल, सनदी सेवा आदी क्षेत्रात प्रचंड वाव आहे. साई संस्था या मुलांचे शैक्षणिक संगोपन उत्तम पद्धतीने करत आहे. ज्या प्रतिकूल वातावरणातून ही मुले येतात आणि साई त्यांच्यांसाठी कार्य करते ते पाहून मी भारावून गेलो आहे.” असे गौरवोदगार युवा प्रेरक वक्ता आणि प्रशिक्षक अक्षय ढमाल यांनी यावेळी काढले.

“या मुलांसाठी साई नेहमीच विविध उपक्रम राबविते. अभ्यासाशी तसं सख्य आणि वातावरण नसणाऱ्या या मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले होते. अक्षय ढमाल यांनी अत्यंत सुलभ पद्धतीने या मुलांना अभ्यासाची गोडी लावली. साईतर्फे मी त्यांचे आभार मानतो”, असे मनोगत साई संस्थेचे संचालक विनय वस्त यांनी व्यक्त केले.

सोशल ऍक्टिव्हीटिज इंटिग्रेशन अर्थात साई ही संस्था गेल्या दोन दशकांपासून देहविक्रय करणाऱ्या महिलांचे उत्कर्ष आणि पुनर्वसनसाठी कार्य करते. या महिलांच्या मुलांना उत्तम शिक्षण आणि संस्कार मिळावे, त्यांना योग्य वातावरण मिळावे यासाठी साई संस्था त्यांना शिक्षण देते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील कोस्टल रोडच्या खोदलेल्या खड्यात पडून मुलाचा मृत्यू

News Desk

कफ परेड येथे खारफुटीच्या झाडाला गळफास लावून तरुणाची आत्महत्या

News Desk

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण; आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

News Desk