HW News Marathi
मुंबई

धक्कादायक…मानखुर्दमध्ये ४ वर्षाच्या मुलीला मारहाण

मुंबई | मुंबईच्या मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परीसरातील एका ४ वर्षाच्या मुलीला त्याच भागात राहणाऱ्या एका महिलेने लिफ्टमध्ये बंद करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र नगरातील एका इमारतीतील ही ४ वर्षाची मुलगी काल (बुधवार) दुपारी खाली खेळण्य़ासाठी जात असतांना रिझवाना शेख नामक महिलेने तीला लिफ्टमध्ये बंद करुन मारायला सुरुवात केली. जवळपास ७-८ मिनिटे ही महिला त्या मुलीला मारत राहिली आणि क्रुरतेचा कळस म्हणजे तिने मुलीच्या अंगावर बसून मुलीला मारले.

या दरम्यान, मुलीचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी मुलीला त्या महिलेपासून वाचवले आणि महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. या मारहाणीमुळे मुलीच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलगी घाबरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिझवाना शेख या महिलेला अटक केली आहे. महिलेवर ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शांतता क्षेत्रात ध्वनीक्षेपक लावण्यास बंदी

News Desk

बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी! – मुख्यमंत्री

Aprna

Dahi Handi |उच्च न्यायालयाने दहीहंडी पथकांवर घातले निर्बंध,बाल गोविंदांचा समावेश असल्यास होणार कारवाई

News Desk