HW News Marathi
मुंबई

ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे निधन

मुंबई | मुंबईचे माजी नगरपाल, ज्येष्ठ समाजसेवक, ‘पद्मश्री’ नाना चुडासामा यांचे आज वयाच्या ८६ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. आज(२३ डिसेंबर) सकाळी चर्चगेट येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केले होते. मुंबईतल्या चर्चगेटमधल्या राहत्या घरीच त्यांचे निधन झाले आहे. आज सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

भाजपच्या नेत्या आणि प्रवक्त्या शायना एनसी यांचे ते वडील होते. जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे ते संस्थापक होते. मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ॲण्ड एड्स, नॅशनल किडनी फाऊंडेशन, कॉमन मेन्स फोरम अशा निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. २००५ साली त्यांनी केलेल्या समाजकार्यासाठी सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांवर ते अचूक शब्दांमध्ये भाष्य करत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या पावसाने घेतला पाच जणांचा बळी

News Desk

कोस्टल क्लीनअप डे’चा उत्साह, श्रमदानाने युवकांनी केली दादर चौपाटीची स्वच्छता

News Desk

Live Updates | नरेंद्र मोदी मुंबई दौरा

News Desk